Ad will apear here
Next
‘सेवासदन’च्या वतीने फराळ व कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन
पुणे : येथील सेवासदन संस्थेच्या दिलासा कार्यशाळेच्या वतीने दिवाळीसाठीच्या फराळ व कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १८ ऑक्टोबर व शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत हे प्रदर्शन पटवर्धन बाग येथील दिलासा कार्यशाळा येथे भरणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

प्रदर्शनातील फराळ व कलात्मक वस्तू या सेवासदन संस्थेतील प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांनी बनविल्या असून त्याची विक्रीदेखील या प्रदर्शनात करण्यात येणार आहे. प्रौढ मतिमंद व्यक्तींच्या विकासासाठी सेवासदन ही संस्था कार्यरत असून, मतिमंद व्यक्तींचे पुनर्वसन करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबी करणे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, समाजात जागरूकरता निर्माण करून त्यांना सन्मान मिळवून देणे यासाठी संस्था प्रयत्न करते.

प्रदर्शनाविषयी :
दिवस : शुक्रवार, दि.१८ व शनिवार, दि.१९ ऑक्टोबर  
वेळ : सकाळी १०.३० ते रात्री ८.३०
स्थळ : सेवासदन इंग्रजी माध्यम शाळा, पटवर्धन बाग, एरंडवणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZWRCF
Similar Posts
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
‘सेवासदन’तर्फे फराळ व कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन पुणे : येथील सेवासदन संस्थेच्या दिलासा या कार्यशाळेतर्फे दिवाळीसाठीच्या फराळ व कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १०.३० ते रात्री नऊ या वेळेत एरंडवणे येथील सेवासदन इंग्रजी माध्यम शाळेत भरणार आहे.
पोलीस बांधवांसमवेत दीपोत्सव पुणे : आपल्याला सण, उत्सव आनंदात साजरे करता यावेत, यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, स्वछता कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी वंदेमातरम् संघटनेचे युवा वाद्य पथक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव साजरा करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language